महापूर
महापूर
पाण्यानं लावली आग
काळीज कुजून गेलं
हिरव्या गच्च असणाऱ्या नदीकाठीचं
सडलेलं वाळवंट झालं
घामाचं पाणी देऊन
ज्या पिकाला मोठं केलं
नदीच्या पाण्यानं त्याचं
तोंड बुडून गेलं
भुईसपाट झालं सारं
पाहून मन झालं मुकं
आभाळच फाटलं असं
हे दुःख झाकाव कसं
महापुराचा प्रलय हा
उरल्या रेताड पाऊल खुणा
जीव लावून पीक पोसलं
हाच का आमचा गुन्हा
भिरभिरते नजर आता
मनी पावसाचे वार
रानाभोवती रुंजी घालतं
सलतो खोल कट्यार
पिकांवरती होती आशा
पुढची पोटाची सोयं
आता हताश हातांचा
छाताडावर हाय हाय
भरलेल्या पिकाचा वास
भरून यायचा श्वासं
आता कुबट कुजलेला
गुदमरतो जीव पाश
वरदायिनी असणारी नदी
का झाली वैरीण आज
का झाली वैरीण आज||
