बोलायला काहीही बोलतात (भा.दोन )
बोलायला काहीही बोलतात (भा.दोन )
लोक काय हो बोलायला कांहीही बोलतात
प्रक्षोभक भाषणांची जणू ओढ
स्वतःचा डंका मिरवतात
जनतेची दिशाभूल करण्या
शाब्दिक शक्लक लढवतात
आपलेच लोक पाय ओढतात
पडद्यामागून सूत्रे हलवतात
लोक काय हो बोलायला कांहीही बोलतात
स्वतः कोरडे पाषाण
इतरांना ब्रह्मज्ञान दाखवतात
आपलं कुकर्म दडवतात
दुसऱ्यांच्या दुःखात सुखी होतात
इतिहास आपल्या पद्धतीने वळवून
स्वतःचा स्वार्थ साधतात
लोक काय हो बोलायला कांहीही बोलतात
कुणी पेरतात कुणी पिकवतात कुणी मळतात
तर कुणी भरल्या पोत्यावरच हक्क सांगतात
काही जण तरी नाकाने वांगी सोलतात
इथे स्त्री-पुरुष भेद नाही
एकमेकांपेक्षा पुढे दिसतात
इतरांना घायाळ करत शब्द बाण खेचतात
लोक काय हो बोलायला कांहीही बोलतात
लोक काय हो बोलायला कांहीही बोलतात||
