मेघ गंधार
मेघ गंधार
ढगांच्या गर्द वरातीतून
नवयुवतीसम सजून आली पावसाची धार
हिरवाईच्या लावण्याने सजली धरणी
नववधूचा जसा व्हावा शृंगार
वृक्षांच्या घनदाट मांडवात
थेंब नाचती नयन चुकार
मोर झाले तल्लीन
आनंदाचा भरला खुमार
आभाळाची प्रीत वेगळी रीत
कधी बरसे धुंवाधार
नदी नाले तुडुंब भरती
दावी प्रेम अपार
बेडकांचे गळे फुलती
ओघळांना तारुण्याचा ज्वार
मना मनातून फुलतो
तृप्तीचा अविष्कार
मृण्मयी चिखल जणू
चिन्मय बने साकार
लाजुनी भिजती पाऊलवाटा
लावण्यखणी अपरंपार
फीटते नयनांचे पारणे
शितलता जणू करे शिकार
रिमझिम असाच बरसत रहावा
मेघ गंधार मेघ गंधार||
