प्रीत पाऊस
प्रीत पाऊस
1 min
8
रुक्ष माझ्या जीवनात
तु आलास पावसासारखा
अलगत वसून गेलास
शिवारातल्या हिरवाई सारखा
दिलस मला तू नव जग
प्रीतीच्या मकरांनं माखलेलं
ऊन्हाच्या तीव्र झळांनां
गर्द ढगांच्या आड झाकलेलं
तू आहेस माझं जीवन
रिमझिम प्रीत सावन
विरघळून गेलोय तुझ्यात मी
फुलली प्रीत लावण
बरसत रहावा असा
तुझ्या प्रेमाचा घनं
फुलून यावे अवघे
बेभान तन मन
कायमचा होशील का माझा?
हीच आहे आस
प्रीत पाऊस माझा
बनलाय श्वास
बनलाय श्वास||
