STORYMIRROR

Sadanand Patil

Classics

3  

Sadanand Patil

Classics

पाऊस निसर्ग छंद

पाऊस निसर्ग छंद

1 min
4

शिवारात चिखल दिमाखात मिरवावा 

पायवाटेला स्वतःचा विसर पडावां

बळीराजाचा आनंद गगनी न मावावा 

मंदिरातला देव जणू सर्वत्र नाचावा 

काळे ढग जोरात बरसावेत

डोंगर कपारी हिरवाईला ऊत यावेत 

सारे जगत संतोषून जावेत 

धर्म जात विसरून माणुसकीचे गीत गावेत 

ऐसा पाऊस भरभरून यावा 

अनंताला त्या सूर हा भिडावा 

अखिल जगताला भरवणारा तो 

पाऊस भरभरून पडावा 

पाऊस भरभरून पडावा|| 



Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics