झिम्मा
झिम्मा
1 min
6
अंगणात पावसानं झिम्मा धरावा
थेंबा थेंबांच्या फुगडीनं अवघा आसमंत व्यापावा
सावळ्याचा घन तो आवडीने बरसावा
तन मनाला सुखावणारा वर्षाव व्हावा
मोहोळ भरून जावेत थंडाव्याने
पावळणीने ताल धरावा
सुमधुर गारव्याने ओढे नाले सजावेत
खळखळ औत्सुक्याचा मारवा झुलावा
लहानग्यांचे ओंजळ व्हावेत ओले
सर्वांच्या नजरेत भाव ते भोळे
फुलाव्यात कळ्या पाने झाडे
किरऀ किड्यांचा आवाज श्रवणीय लागे
तळे भरावेत अवतीभवती
तैराव्यात कागदी होड्या
जागावे मनातील निरागस बालपण
पावलांच्या झिम्मा फुगड्या व्हाव्या
पावलांच्या झिम्मा फुगड्या व्हाव्या||
