सोहळा विवाहाचा...
सोहळा विवाहाचा...
सोहळा विवाहाचा.... आनंदाचा
अतुट नाती अंन प्रेमळ बंधनाचा
सोहळा विवाहाचा... सौख्याचा
दोन आयुष्याच्या मिलनाचा..
सोहळा विवाहाचा... हर्षाचा
हळव्या विरहाच्या क्षणांचा
सोहळा विवाहाचा... आशिर्वादाचा.
सात जन्माच्या वचनांचा..

