पर्यटन
पर्यटन
मजला भासे रोज नव्याने
प्रकृतीचे रूप आगळे...
वसुंधरा शोभे सुंदर
रूप तिचे नित्य वेगळे।।
सह्याद्रीच्या पर्वतरांगा
उंच उंच शिखर फार....
गिर्यारोहण करण्याचा
मिळतो आनंद अपार।।
समुद्राच्या सागर किनारी
लाटा घेता पायावरती.....
पाय रोवून उभे राहता
आपसूक सरके रेती।।
अभयारण्य, सरोवरे
हिमप्रदेशांची मजा न्यारी..
लेण्यांचे सौंदर्य अफाट
पर्यटकांची ती प्यारी।।
भूतकाळातील घटनांची
पर्यटन देई माहिती...
इतिहासातील सम्राटांची
कळते यातून महती।।
पर्यटन करता सृष्टी ही
अनेक गोष्टी शिकवते...
माणसातील माणूसपण
ती सहज जागवते।।
देश विदेशांचे भ्रमण
मन ही फुलपाखरू होते...
गंध घेउनी चार दिशांचे
प्रफुल्लित होऊन जाते।।
तृप्त नयनी पाहून सारे
मन शांत स्थिरावते...
नकळत पुन्हा नव्याने
प्रकृतीस या न्याहाळते ।।
