STORYMIRROR

Sanjay Jadhav

Fantasy

3  

Sanjay Jadhav

Fantasy

मैत्रीचा हप्ता

मैत्रीचा हप्ता

1 min
216

मैत्री म्हणजे एक रोपटं असते 

मनात फुटलेली पालवीअसते

मायेचं खतपाणी द्यावा लागतो 

थोडा वेळ खर्च करावा लागतो 


मैत्री असते मनाचा मनाशी संवाद 

सुख दुःखाचा असतो एक धागा 

भेटावं मित्रांनी दोनचार महिन्यांनी 

 खूप रहावं आनंदी एकमेकांनी 


आयुष्याला असतं विम्याच कवच 

तसंच असावं हो मैत्रीच कवच 

विम्याचा जसा असतो हप्ता 

तसाच असावा मैत्रीचा हप्ता 

 

माराव्या गप्पा, सजवावी मैफिल 

आखाव्या योजना, फिरावे मुक्त 

मनमुराद लुटावा आनंद मित्रांनी 

भरावा हप्ता मैत्रीचा हो सर्वांनी 


येता जीवनात वाईट प्रसंग 

मैत्रीचा येथे लागतो कस 

देतात मित्र मनाला धीर 

मैत्रीच रोपटं फुलेल फार 


नाही दिला तुम्ही वेळ मैत्रीला 

मैत्रीच रोपटं सुकून जात 

वेळीच दिल जर प्रेमाचं खत 

मैत्रीचं रोपं पुन्हा बहरत 


आनंद वाटा, आनंद लुटा 

मैत्रीचा हप्ता वेळोवेळी भरा 

मैत्रीचा प्रवास करीत सुटा 

सुखाने जगा, विचार करा 


जसा भरतो गाडीचा हप्ता 

जसा भरतो घराचा हप्ता 

जसा भरतो विम्याचा हप्ता 

तसा भरावा मैत्रीचा हप्ता 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy