STORYMIRROR

Shila Ambhure

Fantasy

3  

Shila Ambhure

Fantasy

स्वप्न उद्याचे

स्वप्न उद्याचे

1 min
2.1K


वरीस अठरावं

सरलं आता बाई

झालीया घाई

लग्नाची


नार कुलीन

लाजते मनी गुमान

रंगविते सपान

उद्याचे


करी ईचार

असेल कोण धनी

जागा मनी

जयासाठी


सपान रंगविता

हसू फुलले गाली

चढली लाली

तयावरी


स्वप्न उद्याचे

फुलावानी हळू फूलते

डोळ्यामंदी झूलते

झोक्यापरी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy