STORYMIRROR

Smita Murali

Fantasy

3  

Smita Murali

Fantasy

बालकविता'परी'

बालकविता'परी'

1 min
791


परी

आभाळाच्या घरी
राहते म्हणे परी
पांढरशुभ्र झगा
तिचे केस सोनेरी

हातात तिच्या
जादूची छडी
उडायला तिला
पंखांची जोडी

छडीची जादु
वाटते गं भारी
हवं ते मिळते
मज्जाच न्यारी

किती गं सुंदर
परी तुझे रुप
परी तुझ्या गोष्टी
आवडतात खूप

जादूच्या छडीची
गम्माडी गंमत
परीची दुनिया
जम्माडी जंमत

परी तुझी माझी
कधी होईल भेट
ये ना तू भेटायला
घरी माझ्या थेट

स्मिता मुराळी, सोलापूर


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy