STORYMIRROR

Vijay Sanap

Fantasy

3  

Vijay Sanap

Fantasy

बोल कविते माझ्याशी

बोल कविते माझ्याशी

1 min
525


बोल कविते माझ्याशी

आलो गं तुझ्या दारात

वाट गं तुझी बघतो

कसा येऊ मी घरात ।।


बोल कविते माझ्याशी

फिरे मी रानावनात

नको गं सोडून जाऊ

अशा दाट जंगलात ।।


लागलय मला वेडं

तुझ्या गं सहवासाचं

नाही गं मला राहात

भान कविते कशाचं ।।


बोल कविते माझ्याशी

भाव मनाचे फुलते

जाते विसरुन दुःख

पान कळीचे खुलते ।।


बोल कविते माझ्याशी

खोल गुपित मनाचे

तुला ठेवीन अंतरी

सांग ना मोल शब्दाचे ।।


म्हणतात वेडा मला

सारे तुझ्या संगतीनं

बोल कविते माझ्याशी

हसे मगं गमतीनं ।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy