तुझ्या पाऊलखुणा...
तुझ्या पाऊलखुणा...
सुनी सुनी मैफिल विरहाची
तुझ्या आठवणीत घेवून जाते
ओठी हुंदका अन् आसवांसवे
शल्य बोचरे देवूंन जाते...
कसे समजावू या वेड्या मनाला
सहवास तुझा आता होणे नाही
मिळाले सारे दुवे आठवणींचे
तरी तुझ्या पाऊलखुणा मिळणे नाही...
