STORYMIRROR

Priti Dabade

Romance Fantasy

3  

Priti Dabade

Romance Fantasy

हिवाळा ऋतू

हिवाळा ऋतू

1 min
783

आसमंतात ह्या

विलोभनीय धुके दाटते

अंधुक दिसते

दिवसाही


जोर धरी

अंगाअंगात भरी हुडहुडी

गुलाबी थंडी

लोभसवाणी


शरद ऋतूमध्ये

उन्हाचा नाही फटका

घामापासून सुटका

सर्वांची


निसर्ग खुलतो

पारिजातक कसा बहरतो

प्रसन्नता वाढवतो

मनामनाची


पानाफुलांवर मोहक

दवबिंदू कसे चकाकती

लखलखते मोती

भासती


सुका मेवा

देई ऊर्जा तनाला

उल्हास मनाला

वाटे


ऊब देई

स्वेटर, रग, चादरी

शेकोटीची तयारी

घरोघरी


हिवाळ्याच्या दिवसात

गारवा पसरतो हवेत

सख्याला

घ्यावे कवेत


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance