ही रात्र
ही रात्र
रोजच येतो दिस माथ्याला
तत्प उन्हाची काहिली छळता
सांजवेळीस या क्षितिजाला
का मन झुरते रवी विरहाला
रोजच येते ही रात्र सोबतीला
कथा जुन्याच नव्याने सांगायला
वाचते का मन कोडे भावनांचे
ही रात्र संपत नाही त्या कडाला
ही रात्र आणखी गर्द काळोखी
उद्याची असे तिलाही मनी आस
जगते का अशी एका चांदणी
असुयेत भावविश्व ते नित्य नवे
