STORYMIRROR

Neha Ranalkar(Nawate)

Fantasy Inspirational

3  

Neha Ranalkar(Nawate)

Fantasy Inspirational

कस्तुरीमृग

कस्तुरीमृग

1 min
304

सोनेरी किरणांची सांज खुलवून

अरुण तो अस्ताचली चालला |

अनुपम निसर्ग सौंदर्याने दिपून

कस्तुरीमृग जागीच स्तब्ध जाहला | |१| |


अंधारात एकटेपणाचे भय उरात

चिंता सवंगडी आप्त दुरावल्याने |

पाही एकटेच काकुळतीला येऊन

काळोखासवे दिवस बुडाल्याने | |२ | |


पडछाया सुर्यास्ता समयी शोभते

पृष्ठभागावरी विलक्षण त्याची |

रवी बिंबासवे उभारलेली शिंगे

डौलदार शोभती कस्तुरीमृगाची | | ३| |


नाभीत त्याच्या असता कस्तुरी

भटके शोधार्थ तिच्या वणवण |

आयुष्याच्या अखेरीस कळाले

होते व्यर्थची ओझेच मणमण | |४| |


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy