STORYMIRROR

Anil Pandit

Fantasy

3  

Anil Pandit

Fantasy

पुस्तकाची दुनिया

पुस्तकाची दुनिया

1 min
283

पुस्तकाची दुनिया भारी

सफर त्याची निरनिराळी

पुस्तके भेटतात आपुलकीने

ज्ञान देतात नि:स्वार्थ होऊनी


पुस्तकाची मैत्री

केव्हाही प्यारी

दोस्ती हमारी

लय भारी


मनात माझ्या आठवणीच पुस्तक

त्यात आहे बरच काही

जीवनाच्या पानावर

रोज लिहितो काहीतरी


पुस्तके सांगती जगण्यायची रित

त्यांच्यावर जडली माझी प्रीत

पुस्तका शिवाय नाही कोणी वाली

सारं दुनियाच भंडार देई

तो आपल्या दारी


पुस्तके नेती ज्ञानाच्या गावात

अनुभव देती जिवन प्रवासात

पुस्तकांची गट्टी न्यारी

पुस्तकाशिवाय नाही दुनियादारी

पुस्तकात रंग जीवनाचे

पुस्तकात गंध मनाचे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy