प्रेम
प्रेम
रंगात रंग निराळा
प्रेमाचा रंग आगळा
प्रेमात जणू भासे
दुनियेचा रंग वेगळा
प्रेमाला असतो आवाज हृदयाचा
प्रेमाला असतो गंध फुलांचा
प्रेमाला असतो भाव मनाचा
रेशमी बंध बांधणारा
प्रेम म्हणजे निरागसतेचा झरा
प्रेम म्हणजे आठवणीचा ठेवा
प्रेम म्हणजे प्रेमळ क्षणांचा
फुललेला फुलोरा
प्रेम म्हणजे तुझी माझी कहानी
नयनांना नयनांनी दिलेली ग्वाही
फुलत राहो प्रेम मनी
आसमंती इंद्रधनु परी
प्रेम म्हणजे उत्सव प्रेमाचा
प्रेम नव्या जिवनाची आशा
जमाना नवा असो वा पुराना
बदलणार नाही प्रेमाची भाषा

