प्रीत गीत
प्रीत गीत
1 min
216
झाड होऊन बहरत जावे
पक्षी होऊन उडत रहावे
मेघ होऊन बरसत रहावे
चित्र होऊन रंगत जावे
नजर होऊन बघत रहावे
प्रश्न होऊन उत्तर व्हावे
भाव होऊन व्यक्त व्हावे
लाट होऊन उसळून यावे
प्रेमात तुझ्या खेळ या शब्दांचा
असा मांडला मी
प्रीत होऊन तु यावे
अन प्रेमगीत होऊन मी गुणगुणत रहावे
