पळस फुलला रानी
पळस फुलला रानी
1 min
640
पळस फुलला रानी
लाल रंग उधळूणी
मोहक रूप देखणे
पळसाचे ते फुलने
पळस फुलताना फुलतो असा
अबोल प्रीतिला मिळतो शब्द जसा
राना रानात पळस फुलतो
मना मनात वसंत बहरतो
लहरली पळसाची फुले अशी
रात चांदणी बहरली जशी
पक्षांची किलबिलाट कानी
वसंतात गातात पळसाची गाणी
नयनाची नजर
हृदयाची धड धड
पळस फुले जीवनभर
