नव्याने
नव्याने
पुन्हा एकदा
नव्याने…….
प्रेमात पडावे पाऊसाने
चिंब चिंब धरणीला भिजवावे
प्रेमथेंबाने…….
पुन्हा एकदा
नव्याने…….
प्रेमात पडावे फुलाने
सुगंध त्याच्या प्रेमाचा
दरवळावा चोहीकडे
पुन्हा एकदा
नव्याने…….
प्रेमात पडावे चंद्राने
प्रेम त्याचे जणू
नक्षत्राचे देणे

