श्रावण सांगता
श्रावण सांगता
आषाढात न्हाली धरा
शालू नेसली हिरवा
पांचू माणके जडली
उडे पक्ष्यांचा रे थवा
श्रावणात ढग देख
विसावती डोंगरात
ऊन पावसाचा रंगे
खेळ इंद्रधनुष्यात
सण समारंभ थाट
श्रावणाचा निराळाच
मंदिरात फुले दाट
भक्तीचा परीमळच
श्रावणाची रे सांगता
गणेशाची ही चाहूल
लगबग चालू झाली
येता गणाचे पाऊल
सारे हे चैतन्यमय
जगी बहरले सुख
आली कष्टाला उभारी
नका शोधू कुणी मेख
भाद्रपद धाव घेई
सणवार सजवून
सई आवर सावर
घरदार नटवून
