STORYMIRROR

PANKAJKUMAR THOMBARE

Tragedy Fantasy

4  

PANKAJKUMAR THOMBARE

Tragedy Fantasy

डायरी

डायरी

1 min
271

जुनी  डायरी  माझी पुन्हा वाचतो आहे

व्यथेला व्यथा माझी पुन्हा सांगतो आहे


गुलाबी गुलाबाला कुठे भान काट्यांचे

सुगंधास देतांना किती हासतो आहे


जगाला कुठे पर्वा मुक्या खोल घावांची

कथा दोन अश्रूंची पुन्हा टाळतो आहे


जुने वैर प्रेमाशी मला  शल्य जन्माचे

तरी चित्र नकळत मी तुझे काढतो आहे


मला जायचे आहे अशा दूरच्या गावी 

झरा गार प्रेमाचा जिथे वाहतो आहे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy