पहिला पाऊस...
पहिला पाऊस...
तिच्यासोबत छत्रीतून जातानाचा पाऊस गमतीचा,
तिच्यासोबत शेअर केलेला वडापाव लाख किमतीचा.
कमरेभोवती हात टाकतानाचा क्षण मोठ्या हिमतीचा,
आठवतोय तो पहिला पाऊस पहिल्या-वहिल्या प्रीतिचा!!
गोमट्या अंगावरती तिच्या उठला काटा भीतीचा,
हुलकावणी देणारा तो ठेका तिच्या छातीचा,
लुच्चेगिरी करणारा तो पाऊस पुरुष-जातीचा,
आठवतोय तो पहिला पाऊस पहिल्या-वहिल्या प्रीतिचा!!
श्वासात भरला तो दरवळ ओल्या मातीचा,
नयनी साठला उजेस थरथरत्या ज्योतीचा.
तिला जवळ आणणारा पाऊस मोठ्या करामतीचा,
आठवतोय तो पहिला पाऊस पहिल्या-वहिल्या प्रीतिचा!!
तिज गाली विसावला थेंब झाला मोत्याचा,
तोल ढाळू पाहणारा बेत तो त्या रातीचा.
बेहोश झालेला माहौल अवतीभोवतीचा,
आठवतोय तो पहिला पाऊस पहिल्या-वहिल्या प्रीतीचा!!

