STORYMIRROR

प्रदीप माने

Tragedy

4  

प्रदीप माने

Tragedy

आठवणीतला पाऊस

आठवणीतला पाऊस

1 min
395

पावसात भिजणं आवडत मला , 

त्यालाही आवडत सतवायला आम्हाला

मुलं बोलावतात त्याला , 

" ये रे ये रे पावसा " म्हणून

तो त्यांना नाराज करत नाही


अगदी सरसर येतो , 

भिजवून टाकतो माती , कौलं , माणसं .... 

आणि आमचं घरदेखील . 

थोडं गळकच आहे ते , 

T. V. वर ,


पलंग आणि कपाटावर , 

आणखी कोपऱ्यातल्या ओट्यावर , 

अन आमच्या पुस्तकांवर ! 

आई सगळीकडे भांडी लावते

आता भांडीदेखील संपतात


मग पावसाची एक सर कुठूनतरी घरात शिरते

आईची तर त्रेधाच उडते

गुडघाभर पाऊस घरात साचतो

छोटूची होडी तयारच असते

थोडावेळ तरंगते तोच , 

कौलावरची धार होडी बुडवते


छोटू रडू लागतो . 

विजांचा कडकडाट , 

आईचे धपाटे 

नि छोट्याचा आवाज एक होतो


त्याचं रडणं थांबेपर्यंत , 

पाऊसही शांत होतो

" बाबांचा पगार झाला की , 

कौलं बदलू मग घराचं तळं होणार नाही " 


बाबा भिजून घरी येतात , 

आता कौलांपेक्षा छत्रीची गरज असते

आम्हालाही रेनकोट !! 

बाबा रागावलेले असतात , 

आम्ही गप्प होतो


आई तेवढी बोलत असते , 

फुटकी कौलं दाखवत असते , 

फुटक्या नशिबावर रडत असते


बाबा डोक्याला हात लावतात , 

" काय झालं ? " 

" आजच पगार झाला , 

खिसा कुणीतरी कापला !! " 

बाहेरच्या पावसाला तोवर चांगलाच जोर येतो


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy