STORYMIRROR

प्रदीप माने

Others

4  

प्रदीप माने

Others

बायको...

बायको...

1 min
293

कधी वाटतं ही आपल्यासाठी काय करते?

कधी वाटतं ही आपल्यासाठी काय-काय करते!!


कधी तिचं बोलणं वायफळ बडबड वाटते,

कधी तिची बडबड सुद्धा हवीहवीशी वाटते.


बाजारातली तिची घासाघीस नकोशी वाटते,

महिना अखेरीस तिची काटकसरच कामी येते.


भांडतो मी तिच्याशी, जेव्हा मुलांना रागावते,

पण मुलांची प्रगती बघून, तिची तळमळ कळते.


राग येतो जेव्हा रविवारी झोपेची वाट लावते,

मग आठवते, अरे ही तरी कुठे सुट्टी घेते.


कधी ती बिन फोडणीचं वरण वाटते,

नि तिच्याशिवाय जिंदगी कधी बेचव वाटते.


Rate this content
Log in