STORYMIRROR

Sarika Jinturkar

Fantasy Others

4  

Sarika Jinturkar

Fantasy Others

कविता माझी ओळख

कविता माझी ओळख

1 min
301

शब्दांच्या तेजाने ओळी प्रकाशल्या 

भावनांच्या सौंदर्याने लेखणीतून सजल्या  

सुखदुःखाच्या सरीत अविरतपणे बरसल्या

 प्रेमाच्या काव्यातून कधी हसल्या 

विरहाच्या वेदनेने कधी पाणावल्‍या  


 शब्दरूपी उमललेल्या

 फुलांची बाग ही 

मनात माझ्या सजली 

कळलेच नाही कधी 

ही ओळख बनली

मी लिहत गेले अन्  

कविता बनत गेली  


लेखणीस धार देऊन

उतरविल्या मग भावना

 कागदावरती शब्द जणू

शिल्पमोती लेवून गेली  

 

कविताच बनली माझी ओळख

शब्द बनले सोबती

 मनाला समाधान, ओठांवरती हास्य 

मनातील काळोख ही नेहमी दूर करित गेली  


प्रत्यय लेखणीचा आता 

 कळला मला 

भविष्याची सुखद वाट 

ही निश्चित सुचवून गेली..  



Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy