स्वप्न पाहू भविष्याचे
स्वप्न पाहू भविष्याचे
होते विचारात मग्न
विचारात लागे तंद्री
स्वप्न भविष्याचे पाहू
झाली की मनात गर्दी
जग पाहिले स्वप्नात
मनोहर रमणीय
जन घेतात काळजी
राखण्यास लोभनीय
विश्व शांतीचा एकची
सर्व जगी नांदे भाव
जन गुण्या गोविंदाने
नसे कुणा दुःख ठाव
नाही कोणीच उपाशी
सर्व जनांना निवारा
समजून राही जन
कुलुपाचा न पहारा
जन जपतात नाती
विश्व बंधु भाव मनी
संस्कृतीची परंपरा
दिसे सदा क्षणोक्षणी
रोज येती सांजवेळी
ऐकायला पसायदान
देई संदेश जगाला
विश्व शांती योग्य दान
