STORYMIRROR

Jayshri Dani

Classics Fantasy

4  

Jayshri Dani

Classics Fantasy

मैत्री

मैत्री

1 min
289

नभाची अन धरतीची मैत्री अशी सुंदर

जशी कृष्ण सुदाम्याची उमज खोलवर


राधा अन मिलिंदाची मैत्री अशी सुंदर

जिवाशिवाचे मिटले जसे गूढ़ अंतर


फूल आणिक काटयाची मैत्री अशी सुंदर

रागात अनुरागाचे मुलायम मंतर


नेत्र अन अधराची मैत्री अशी सुंदर

हृदयातले गूज अलगद येई वर


भूक अन तहानेची मैत्री अशी सुंदर

हाती हात घेवून सोबतसे दूरवर


कडू आणिक गोडाची मैत्री अशी सुंदर

सुखामागून दुःखाची सावली जशी अधर



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics