स्वप्न
स्वप्न
स्वप्नातील गावांचा नसतो पत्ता
स्वप्नातूनच मिळे वाट चुकलेल्यांना रस्ता।
स्वप्नाच्या दुनियेत असते अशी मजा
जिथे चाकरालाही होता येते राजा।
स्वप्न बाळगता, सफल होईल मनीची आस
स्वप्न भंग झाल्यास नका होऊ निराश।
मनीच्या स्वप्नांना असती मोकळया वाटा
सत्यातील वाटांना फुटतो फक्त फाटा।
स्वप्न असे मनींची कलाकृती
ज्याने उजळेल स्मृतीच्या वाती।
स्वप्नांचे असती विविध प्रकार
काही देती जीवनास हाेकार तर काही नकार।
स्वप्नांच्या ब्रशने आयुष्य रंगवावे
गडद फिक्या रंगाने आयुष्य खुलवावे।
