देव विकायला आले
देव विकायला आले
फिरता फिरता बाजारात
अगळीतच दिसले
चक्क देव विकायला आले
दिसायला देव एका पेक्षा एक
कोणाचा बारका तर कोणाचा मोठा
कोण शाडूच्या तर कोण पीओ पि तला
देव चक्क बाजारात विकायला आले
पाचशे सहाशेत आता देव येत नाहीत
महागाईची झळ देवालाही बसलीय
कमितला देव फिका आणि
किमतीचा देव पक्का असा
चक्क देव बाजारात विकायला आले
तो ही नाही राहिला कोनाचा
जो तो त्याला विकताना दिसतोय
गणोबा मात्र डोळे विस्परून पाहतोय
खरा मी की तो दोन्ही हात पसरून
स्वतःलाच आजमावतोय
नाचतेला,झोपलेला,उडतेला देव
माणसानी त्याला घडविलाय
कोणाच्या रुपात पाहिजे देव
तसा देव आकारला जातोय
उंदरला पण बरं वाटतंय
देवाच्या किमतीत तो ही विकला जातोय
देवाच्या मुकुटाप्रमाणे त्याला ही सजवले जातंय
फिरता फिरता बाजारात
अगळीतच दिसले
चक्क देव विकायला आले
