नवा संकल्प
नवा संकल्प
येता जाता दिसती पथावर
उघडी नागडी ती बालके
संकल्प नवा उरी बाळगला
करीन मी यांना बोलके...
हातात पुस्तक पेन देत
करूया सुरूवात संकल्पाची
नसतांनाही हातात छडी
मला पाहून मुले दुर पळायची..
खाऊ घेऊन मग पोचले दारी
हात पुन्हा पुन्हा पुढे त्यांचे
भुकेचा भस्मासुर किती भारी
भाकरीचे शिक्षण व्हावे यांचे..
आपल्या शिक्षणात आहे का?
शास्त्र अन्न मिळवायचे कसे?
लिहुन वाचून आम्हीही झालो
शिक्षित बेकारीत जगावे कसे?...
उच्च शिक्षित शोधात नोकरी
टपोरी मस्त करी राजकारण
आज सत्ता हातात तयांच्या
अनाथाला दूरच भात वरण...
