यशाची वाट
यशाची वाट
कुणीतरी विचारलं मला,
कशी असते यशाची वाट..
मी म्हणालो,सरळसोट कड्यापरी,
पायऱ्या नसणारा असेल घाट..
रात्रीच्या अंधाराहून,
कुट्ट असेल काळोख फार..
काटे करतील पायाची चाळण,
कधी वाटेल जणू अंगार..
तुझ्या मार्गात आडवे येतील,
माणसांच्या रूपातले अडथळे..
केव्हा वाटतील ते जीवघेणे,
वाघाच्या जबड्यातील सुळे..
किती झाले तरीसुद्धा,
सोडायचा नाही आपला ध्यास..
यत्न, श्रम, विश्वासाने
तुला मिळेल यशाचा घास..
