शाळेचे गेट
शाळेचे गेट
शाळेसमोरच्या वाळुवरती,
आठवणींच्या पाऊलखुणा..
मित्र-मैत्रीणींच्या पारव्यांचे,
थवे इथे आले पुन्हा..
बाकावरल्या गप्पा-गोष्टी,
रंगल्या आता कट्ट्यावरती..
किस्से काही जुने पुराणे,
वय विसरुनी लहान करती..
लहानपणीच्या खोड्या-मोड्या,
हसवू लागल्या आज आता..
तेच आयुष्य सुंदर होते,
सांगू लागल्या नव्या कथा..
कितीही मोठे झालो तरी,
शाळेसाठी लहान होऊ..
वेळामधून काढून वेळ,
दोस्तांसाठी राखून ठेऊ..
दरवर्षी एक दिवस,
होऊ दे अशीच गाठ-भेट..
पुन्हा एकदा भरून जाऊदे,
मैत्रीने फुललेले शाळेचे गेट...
