STORYMIRROR

Vikram Wadkar

Others

3  

Vikram Wadkar

Others

भार (गझल)

भार (गझल)

1 min
116

तुजविन मज माझे, क्षण चार सोसवेना,

अश्रुंचाच नयनी, मज भार सोसवेना...||


रात आजची हि मज छिन्न-छिन्न वाटे,

स्वप्नं रोजची ती आता भिन्न-भिन्न वाटे,

आक्रोश या मनीचा, हुंकार पोचवेना..||


मांडू शब्द कसले जे संथ होत गेले,

काव्य ते मनीचे मग ग्रंथ होत गेले,

आठवांचे काटे मज फार बोचवेना...||


रित्या या मनाला समजावू सांग काय,

थिजलेल्या भावनांनी सुचे कसा उपाय,

रिक्त या जीवाला विचार टोचवेना...||


Rate this content
Log in