निळाई
निळाई
कुणी पसरली दुर नभावर…
चमचमणारे मोती..
कुणी घडवली पत्थर फोडून..
तांबूलरंगी माती..
भल्या पहाटे ऊजळून निघते..
केसर लेवून प्रभा..
फुलवून जाते देहफुलाची..
परीमळणारी आभा..
लता उगारून अंबर गरजे..
मेघ उगा सावळा..
मोदून जाती जीव तयांवर..
वाटे सण सोहळा..
भरजरी नक्षी माळून येती..
उडती अशी पाखरे..
दुर कुठे मग कोकीळ देई..
सुमधुर ती हाक रे..
उंच कड्यावर खळखळणारा..
तुषार उडवे झरा..
पाऊस देता हळूच चाहूल..
नाचे मोर बावरा..
प्रारब्धाचे चित्र काढण्या..
इंद्रधनूची शाई..
अशीच राहो स्मृतीत माझ्या..
क्षितिजापार निळाई..
