दवबिन्दु
दवबिन्दु
पहाटेला
स्वप्नामध्ये
गोल आले
हातामध्ये.
निरखून
मी पाहिले
चकितच
मी राहिले.
दवबिन्दू
बहु मोठा
वाटे मज
गोल खोटा.
चमचम
त्याचे रुप
प्रकाशित
तेज खूप.
पाऱ्यापरी
हाले गोल
मी सांभाळी
त्याचा तोल.
मजसाठी
अनमोल
नाजूक तो
दव गोल.
तयासाठी
मी शोधली
कुपी एक
मनातली.
*******************

