STORYMIRROR

सुमनांजली बनसोडे

Romance Others

3  

सुमनांजली बनसोडे

Romance Others

खरंच का रे...

खरंच का रे...

1 min
242

खरंच का रे एकदाही नाही वाटले...

प्रेम माझ्याबद्दल...

घराजवळून सोबत शाळेत जाताना नाही...

पण शाळेत एका बेंचवर बसल्यावर तरी...

हसताना आणि बोलताना नाही....

पण अबोल असताना तरी...

नजरेला नजर मिळताना नाही...

पण शाळेतून घरी येताना तरी...

खरचं कारे एकदाही नाही वाटले....


दिवसाच्या घाई गर्दीत नाही...

पण रात्री स्वप्न रंगवताना तरी...

काॅलेजला जाताना नाही...

पण गच्चीवर असताना तरी...

माझे लग्न ठरवल्यावर नाही...

पण तुझे लग्न असताना तरी...

खरचं का रे एकदाही नाही वाटले....


मला पाहिली पाहिल्यावर नाही...

पण बायको माहेरी गेल्यावर तरी...

तुझ्या मुलांसोबत असताना नाही...

पण माझे मुले पाहील्यावर तरी...

वयाच्या 40 नंतर नाही...

पण BP, शुगर ची गोळी घेताना तरी...

खरचं का रे एकदाही नाही वाटले...


तुझ्या मुलांच्या लग्नात नाही...

पण माझ्या मुलांच्या लग्नात आल्यावर तरी.

नातवंडाच्या बारशाला नाही...

पण 75 वा वाढदिवस साजरा करताना तरी...

माझ्या पतीच्या अंतविधीला आल्यावर नाही...

पण तुझी बायको गेल्यावर तरी...

खरंच का रे एकदाही नाही वाटले.. 

प्रेम माझ्याबद्दल...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance