तू माझे विश्व सारे
तू माझे विश्व सारे
सांग तुझ्यासाठी काय आणू
चंद्र-तारे की सुंदर पिसारे
हृदय झाले वेडे तुझ्यापाठी
तूच आहे माझे विश्व सारे
नक्षत्रासारखी सुंदर तू
रूप तुझे मन मोहणारे
हृदय झाले वेडे तुझ्यापाठी
तूच आहे माझे विश्व सारे
केवढ्या परी रंग तुझा
नयन तारकांपरी लखलखणारे
हृदय झाले वेडे तुझ्यापाठी
तूच आहे माझे विश्व सारे