STORYMIRROR

सुमनांजली बनसोडे

Romance Others

3  

सुमनांजली बनसोडे

Romance Others

तु तुच आहेस ना.

तु तुच आहेस ना.

1 min
171

आज पाहताक्षणी तुला ...

आला आठवणींना ओलावा...

तारुण्यातला तू... अन् वृद्धापकाळातला तू....

तू तूच आहेस का रे.... 

की.. मी बदलले... सांग ना... 

एकमेकांची वाट पाहत...

बसणारे आपण...

अन् क्षणात परकेपणाची ...

जाणीव करणारे आपण...

पण, हा... एकमेकांच्या विचारांचा ही

स्वीकार करणारे आपण...

आणि महत्वाचं म्हणजे ...

आई वडिलांच्या ईच्छा खातर ...

दूर ... विभक्त... होऊन .. प्रेमाचा त्याग करणारे आपण...

पण आजही .. प्रत्येक भेटीला... आतुरलेले आपण... 

ते दडपण आहे... तो हव्यास ही आहे... 

आता ही ओढ आहे... त्या तारुण्या पलिकडची... 

तेच प्रेम... तू जर दिले .. आजही...

समाजाला डावलून... 

तर मी ही नक्कीच स्वीकारेल...

नाहीतर आल्या पावली निघून जाईल...

वास्तविकेतला तू बदललेला असलास ना... पण..

पण... माझ्या आठवणीतला तू आणि तूच राहशील... 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance