STORYMIRROR

Jyoti Sakpal

Romance

3  

Jyoti Sakpal

Romance

प्रेम आणि प्रवास

प्रेम आणि प्रवास

1 min
392

जीवनाच्या या प्रवासात तुझी साथ होती 

कधी तुझ्याबरोबर तर कधी लांब होती 

क्षणाला क्षणाचे कधी बंध नसावे 

आपल्या त्या प्रवासाचे मी किस्से लिहावे 

खूप होते प्रश्न ज्याची उत्तरे शोधली 

प्रत्येक उत्तरला कर्तव्याची गाठ बांधली

न बोलली मी कधी न बोललास तू कधी            

न केली तक्रार मी कधी न केली तक्रार तू कधी 

आता वाटते राहिलेले सर्व क्षण तुझ्या बरोबर  

जगावे उरलेल्या या प्रवासात मी फक्त तुझे नाव घ्यावे  

थकलेल्या डोळ्यांनी तूला मी बघावे मला तू बघावे 

मिलनाच्या  या क्षणाला वेळेनेही थोडं मग थांबून घ्यावे

मी तुला सांगावे तू मला सांगावे              

तुझ्या माझ्या प्रेमाचे जगाने किस्से लिहावे 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance