रमताना आठवणींत
रमताना आठवणींत


कोण म्हणतं आठवणी फक्त मनातच साठतात
कधी अचानकच जुन्या वळणावर ही त्या भेटतात
कधी ओळखीच्या सुवासानेही त्या दरवळतात
तर कधी एखाद्या चवीमुळे जिभेवर ही रेंगाळतात
कधी जुन्या गाण्यामधून थेट मनाला येऊन भिडतात
तर कधी एखाद्या स्पर्शातून देखील जाणवतात
कधी बरसू लागतात पावसाच्या थेंबातून
तर कधी हाती लागतात पुस्तकातील जाळीदार पानातून
वर्तमान विसरायला लावतात नी थेट भूतकाळातच नेतात
इतक्या काळाने भेटल्याने मनाला हूरहूरच लावतात
फक्त एखादी गोष्ट ही पुरते आठवणींचा क्रम सुरू व्हायला
मन तर अधीरच असते त्यांनाही सामावून घ्यायला