गेलीस तू निघून
गेलीस तू निघून


गेलीस तू निघून काही न सांगता.
केलीस प्रीतीची का निष्ठुर सांगता...
संबंध तोडला तू बांधून घट्ट गाठ.
देवून हात हाती का फिरविलीस पाठ.
आले कसे तुला ग बेबंद वागता...(१).
अर्ध्यात चालताना घ्यावास तू निरोप.
माझ्या खुल्या मनाचा सांगू कुणाला विला
प
अस्तास चंद्र गेला का रात रंगता...(२).
भंगले ते स्वप्न माझे गीत ओठी लोपले.
क्रूर ही थट्टा तुझी! दैव माझे लोपले
दो दिसांच्या प्रितीचे भाग्य माझे संपता...३).
झाल्याचं भिन्न वाटा, प्रीत अर्धी राहिली.
दगाबाज विश्वाची रीत खोटी पाहिली.
शून्य चित्ती कोंडली आपुली अर्धी कथा...४)