बरसला मेघ
बरसला मेघ


बरसला मेघ निळा सावळा.
हा नच पाऊस प्रीत हरीची.
नाही घालीत मला
यमुना काठी उभी एकटी.
पाहत होते वाट कधीची.
तू नच येता आज खट्याळा.
मेघ धाडीला निळा...1.
वन वाऱ्याची वाजत वेणू.
चरताचरता भिजल्या धेनु.
बावरल्या त्या, बावरले मी.
गोविंदा घननिळा...2.
केलीस कृष्णा भलती खोडी.
गवळण ही मुलखाची वेडी.
जलथेंबातूनी तव नुपुरांचा.
मधुर नाद नादला....3.