थँक यू टीचर
थँक यू टीचर


जात धर्म पंथ या पलीकडे
असतो त्याचा ध्यास,
माणूस म्हणूनच कदाचित
एक शिक्षक असतो खास,
वेगळ्या रूपात वेगळ्या ठिकाणी
मार्गदर्शक म्हणून भेटतो,
जन्मासोबतच मायबाप होऊन
बोट धरून चालतो,
बाराखडी असो शाळांमधली
वा पीएचडी पदवी नंतर,
विद्यार्थी बदलत राहिले तरी
एक शिक्षक देत नसतो अंतर,
संकट असू दे कितीही मोठे
एक बाप म्हणून असतो समोर,
धोपट मार्गावर कान पकडून
जेव्हा आई जीवा लावते घोर,
गरज असल्यावर धावून येतो
एक मित्र सुद्धा शिक्षक असतो,
सुखात आला नाही परी
दुःखात मात्र नक्की दिसतो,
नैराश्याच्या नकारात्मकतेत
आशेचा एक होकार असतो,
कुसंगतीच्या हुंकारामध्ये
निर्मळतेचा ओमकार असतो,
प्रसंगी कठोर प्रसंगी मृदू ऐसा
गुरू मारकाला तारक असतो,
भरकटलेल्या आयुष्या दिशा दावुूून
शिक्षक नेहमीच प्रेरक असतो,
ज्ञानेश्वरीतील वचनासारखा
गुरू पवित्र ज्ञानेश्वर असतो,
माणूस नि गुरूत फरक की
माणूस आजन्म विद्यार्थी, गुरू मात्र अजरामर असतो,
जात धर्म पंथ या पलीकडे
असतो त्याचा ध्यास
माणूस म्हणूनच कदाचित
एक शिक्षक असतो खास. . .
एक शिक्षक असतो खास