नऊवारी ते मॅक्सी
नऊवारी ते मॅक्सी


स्वयंपाक घरातील ओटा कसलासा विचार होता करत
खरं सांगायचं तर तो कुणाच्या तरी आठवणीत होता झुरत
स्वयंपाक घरात जरी तो होता नवखा तरी
नऊवारीनं त्यांस केला होता अपुला
अनं तिच्या हाताचा प्रत्येक चटका
त्यानं त्याच्या हृदयात होता जपला
दिसभर स्वयंपाक घरात तीच एक वावरत असे
स्वच्छ करून ओटा रोज ती त्याला आवरत असे
ओट्याशी बोलताना ती पोळपाटावर पोळ्या लाटी
तोंडाने अबोल तरी तिच्या मनात शब्दांची दाटी
पुढे नऊवारी थकली..... अन
स्वयंपाक घरातील प्रत्येक गो
ष्ट तिने पाचवारीला विकली
प्रारंभी पाचवारी होती एक अननुभवी मुलगी
लवकरच साधली तिनं ओट्याशी पोळपाटाशी सलगी
पाचवारीनंही त्यांना असा काही लावला लळा
दूर जाताना ती त्यांचा दाटून आला गळा
पाचवारीच्या जागी आली आता एकसंध मॅक्सी
सोबत तिच्या आणली तिनं नवी कोरी मिक्सी
आता तो ओटा त्या मिक्सीशी त्रयस्थपणे वागतोय... आणि
जळमटानं माखलेला पोळपाट हुंदके देऊन रोटी मेकर कडे बघतोय
स्वयंपाकघरातील ओटा हाच विचार होता करत
नऊवारी आणि पाचवारीच्या आठवणीत तो होता झुरत