ओझे अपेक्षांचे घेऊनी पाठीवर
ओझे अपेक्षांचे घेऊनी पाठीवर

1 min

234
झाले ओझे अपेक्षांचे,
घेऊनी पाठीवर गाठोडे
किती फिरणार आता,
ताण असा कणा मोडे!
आशा बाळगल्या स्वप्नात
ठेवल्या जपून उशाशी,
आठवांना सा-या जमवून,
धाडले मनाच्या तळाशी!
इच्छा एकवटल्या त्यांना,
कवटाळून धरले उराशी,
उलगडणार कधी अशी,
आस उरली ना जराशी!
अपुरे का पडलो याची,
जीवा क्लेश देई जाणीव,
संधी दुजी मिळाली नाही,
याची भासे सदा उणीव!