कथानक
कथानक


त्याच त्याच भूमिका अन
त्याच त्याच कथा पुन्हा
नव्याने भेटाया येती
नाविन्याच लेण लेऊनी ....
अवतीभवती खेळ च तो
दृश्य आकृती पडद्यावरील
असेल जागे मन आणि दृष्टी
जाणवते मग काळ ची गती ..
बदलते जग सतत रुपड़े आपले.
पुढे ही जाते ,न फिरूनी मागे येते
त्याच त्याच घटना नव्याने समोर
ग्रहगोल ची अनुभूती..
जग पूर्वीचे च कथानक
अभिनेते बदलतात फक्त
होतात ईथे साजरं सोहळे
भूतकाळातील प्रसंगाची
अन विसर पडतो मग
निर्मितीचे मूळाशी काय ते?
अनुभवाची आणि ज्ञानाची चुरस
अभिनयाने जागवते हे जग...