क्षण एक आनंदाचा
क्षण एक आनंदाचा
आयुष्य सरते शोधण्यात
तो क्षण एक आनंदाचा
परी आहे तो स्वतःपाशी
आताचा हा पळ मोलाचा!
दिवस रात्र अविरत काम
थांबून ना उसंत घेतली
श्वास फुलून आला जेव्हा
किंमत वेळेची कळली!
काल झाले, होऊन गेले,
उद्याचे कोणास माहित,
वर्तमान असे अटळ आहे,
त्यातच जीवन समाहित!
जगण्यास आहे खूप काही
उतावीळ होऊन का मरावे
कर असे काही तरी तू जगी
मूर्तीत नाही, किर्ती रूपे उरावे!