Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Siddharth Satbhai

Abstract Others

3  

Siddharth Satbhai

Abstract Others

आम्ही शिवजयंती साजरी करतो

आम्ही शिवजयंती साजरी करतो

1 min
33


आम्ही शिवजयंती साजरी करतो

सहा फुटी झेंडे मिरवतो

बेंबीच्या देठापासून जयघोष करतो

आम्ही शिवजयंती साजरी करतो


आम्ही शिवजयंती साजरी करतो

पण आम्हीच स्त्रीला जिवंत जाळतो

जिजाऊच्या लेकी भोगवस्तू मानतो

आम्ही शिवजयंती साजरी करतो


आम्ही शिवजयंती साजरी करतो

डॉ. प्रियंका असो वा हिंगणघाटची प्राध्यापिका

हताशपणे त्यांचे मरण पाहतो

आम्ही शिवजयंती साजरी करतो


आम्ही शिवजयंती साजरी करतो

आम्हीच महापुरुषांना जातीपातीत वाटतो

गांधी आमचे सावरकर तुमचे यातच धन्य मानतो

आम्ही शिवजयंती साजरी करतो


आम्ही शिवजयंती साजरी करतो

ज्यांनी स्वातंत्र्य दिले देशाला

त्या विभूतींनाच चौकटीत बांधतो

आम्ही शिवजयंती साजरी करतो


आम्ही शिवजयंती साजरी करतो

भ्रष्टाचार होतांना सर्रास पाहतो

वेळ पडली तर आम्हीच लाच मागतो

आम्ही शिवजयंती साजरी करतो


आम्ही शिवजयंती साजरी करतो

बळीराजाला खोटी स्वप्ने आम्हीच दावतो

आम्हीच कष्टकऱ्यांची भाजी-भाकरी मारतो

आम्ही शिवजयंती साजरी करतो


आम्ही शिवजयंती साजरी करतो

आम्हीच प्रसंगी सत्तेसाठी देश जाळतो

आम्हीच एकमेकांमध्ये फुट पाडतो

आम्ही शिवजयंती साजरी करतो


आम्ही शिवजयंती साजरी करतो

शिवरायांची प्रतिमा मस्तकी धारण करतो

मात्र शिवरायांचे आचरण साफ विसरतो

आम्ही शिवजयंती साजरी करतो


आम्ही शिवजयंती साजरी करतो

तारीख की तिथी यावर भांडतो

मी मर्द मावळा शिवरायांचा

आजचे दाहक दृश्य मांडतो

आम्ही शिवजयंती साजरी करतो


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract